महाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

त्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी 'महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते आणि त्याकाळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,' असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

'महाभारत काळात युद्धात काय होत आहे हे संजय धृतराष्ट्राला सांगत होते. याचा अर्थ त्याकाळातही टेक्नॉलॉजी होती. इंटरनेट होते. म्हणजे त्याकाळातही या देशात इंटरनेट अस्तित्वात होते,' असा दावा देव यावेळी बोलाताना म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'डिजिटल इंडिया' योजनेचे कौतुक करताना देव यांनी हा दावा केला. मोदी स्वत: सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? याची ते इतरांनाही विचारणा करतात,' असेही त्यांनी सांगितले.आणि त्यामुळेच मोदी सत्तेत आल्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर सुरू करणे सर्वांना गरजेचे वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Saam TV Live