बापरे!  चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जिगिना गावात एका महिलेने चक्क चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला आहे! हा दैवी चमत्कार असल्याचं मानून गावकरी बाळाला पाहायला एकच गर्दी करत आहे.

बाळाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत आताच काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले असून वैद्यकीय तपासणी नंतरच याबाबत काही कळेल असे सांगितले.

येथील जिगिना गावात भूलन निषाद हे आपली पत्नी रंभा हिच्यासोबत राहतात. भूलन हे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. रंभाला शनिवारी (ता. 15) प्रसूतीकळा सुरू झाल्या. स्थानिक सरकारी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे तिने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला. हे पाहून डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्का बसला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live