आमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी - चंद्रकांत पाटील

सरकारनामा
शनिवार, 7 मार्च 2020

राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी घोषणा करताना दोन लाखांवरील कर्जाच्या एकरकमी कर्जफेडीसाठी मदत करण्याची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही सरसकट कर्जमाफी नाही. प्रथम शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा जास्तीचे कर्ज फेडले तरच त्यांना लाभ मिळणार नाही. 

पुणे - भारतीय जनता पार्टीच्या धरणे आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली. त्यामुळे आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय झाला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तथापि, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासनाप्रमाणे मदत देणे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे या मागण्या शिल्लक असल्याने भाजपा शेतकऱ्यांच्या प्रश्नी लढा चालूच ठेवणार, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा - राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार; मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त

राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी घोषणा करताना दोन लाखांवरील कर्जाच्या एकरकमी कर्जफेडीसाठी मदत करण्याची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही सरसकट कर्जमाफी नाही. प्रथम शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा जास्तीचे कर्ज फेडले तरच त्यांना लाभ मिळणार नाही. शेतीपूरक कर्जाच्या माफीचा उल्लेख नाही. परिणामी सातबारा कोरा होणार नाहीच. शेतकऱ्यांसाठी खूप काही करत असल्याचा आव या सरकारने आणला असला तरी ठोस काहीच केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नी भाजपचा लढा चालूच राहील. 

भाजपाने महिलांच्या सुरक्षिततेसाठीही धरणे आंदोलन केले होते. महाविकास आघाडी सरकाकरने त्याची दखल घेऊन अर्थसंकल्पाच्या भाषणात त्याचा उल्लेख केला असला तरी महिला सुरक्षिततेसाठी ज्या घोषणा केल्या आहेत त्या ठोस नाहीत. महिला सुरक्षिततेबाबत केलेले उपाय वरवरचे असून हे सरकार गुंडावर कसा वचक निर्माण करणार हे सांगितलेलेच नाही. त्यामुळे या प्रश्नावरही भाजपचा लढा चालूच राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला ग्रामीण जनता, बेरोजगार अशा सर्वांना ठोस काहीच न देणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title bjp agitation compels government help farmers says chandrakant patil


संबंधित बातम्या

Saam TV Live