नानांच्या पॉलिटिकल एन्ट्रीवर प्रश्‍नचिन्ह; भाजपकडून नानांच्या उमेदवारीला रेड सिग्नल ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका बसलाय. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी नाना पाटेकरांचं नाव भाजप पक्षश्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आलं होतं पण आता तनुश्री वादामुळे नाना पाटेकरांचं नाव प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नानांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. 

नाम या सामाजिक संस्थेमुळे राज्यातील जनतेत नानांचं वेगळं स्थान निर्माण झालंय. त्यात रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 ते 25 टक्के भंडारी समाज असल्यानं, नाना पाटेकर नावाचा पत्ता राजकारणात चालू शकतो, अशी राजकीय गणिते केली गेली होती.

विशेषत: स्वबळावर लढायची वेळ आली तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत यांना नाना पाटेकर काँटे की टक्कर देतील असा अंदाज लावला जात होता. मात्र, मी टू चळवळीनंतर नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीनं केलेल्या आरोपांमुळे नानांच्या राजकीय पदार्पणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live