भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदाची 'ऑफर'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासाठी भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व अजिबात तयार नाही. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवाळीनंतर, म्हणजे 29 तारखेच्या आसपास मुंबईत जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर सारे काही सुरळीत होऊन भाजपचा मुख्यमंत्री व शिवसेनेचा उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला घेऊन राज्यात युतीचे नवे सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्‍वास भाजपमधील पक्षसूत्रांनी दिल्लीत व्यक्त केला. 

शहा यांनी स्वतः "मातोश्री'वर जाणे व त्यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करणे इतकाच महत्त्वाचा भाग युती सरकारच्या सत्तारोहणामध्ये बाकी आहे व 2014 प्रमाणेच 31 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री व यंदा उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होण्यासाठी भाजप नेतृत्व प्रयत्नशील आहे, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेला काही महत्त्वाची मंत्रिपदे दिली जातील, असेही त्यांनी सूचित केले. 

हरियानात भाजपला बहुमत नसूनही सत्तेचा मार्ग मोकळा झाला; मात्र महाराष्ट्रात युती बहुमतात असूनही सत्तेचा खेळ रखडला व तो बिघडल्याच्याही बातम्या येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते अधिकृतरीत्या तोंड उघडण्यास तयार नाहीत. निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी, आत्ताच मी याबाबत काही बोलणार नाही, असे सांगून हात झटकले. राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे ठामपणे सांगितले आहे. शहा-ठाकरे यांच्यातील चर्चेआधी त्यांनी ही माहिती दिल्याबद्दल पक्षनेतृत्व पांडे यांच्यावर नाराज झाल्याचेही समजते.

एका भाजपनेत्याने सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकालाच्या दिवशीचे भाषण तुम्ही नीट ऐकले असते, तर मुख्यमंत्री कोणाचा, शिवसेनेचा दबाव कसा येत आहे, या बातम्या तुम्ही दिल्याच नसत्या. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढची पाच वर्षे महाराष्ट्राचा विकास होईल, असे मोदी यांनी अत्यंत स्वच्छपणे सांगितले होते. त्यांना शिवसेनेच्या संभाव्य भूमिकेची कल्पना नसेल इतका भाबडेपणा तुम्ही कसा दाखवता, असा खोचक प्रश्नही या नेत्याने विचारला. 

सत्ते पे सत्ता...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज्यात युतीचीच सत्ता येईल असे म्हटले आहे. राज्यात काय चालू आहे, या प्रश्नावर "सत्ते पे सत्ता' चालू आहे असे सांगून आठवले म्हणाले, की शिवसेना व भाजप हे जुने मित्रपक्ष आहेत. त्यांनी सरकार बनविणे हे नैसर्गिक न्यायाला धरून होईल.

युतीमध्ये शिवसेनेच्या जागा कमी आहेत, तरीही अडीच- अडीच वर्षे नेतृत्व करण्यावर त्या पक्षाचे नेतृत्व ठाम असेल तर भाजपने त्यांचा गंभीरपणे विचार करावा. अन्यथा पाच वर्षे शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदावर राजी व्हावे. पुढच्या चार ते पाच दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल असे मला वाटते. 

Web Title: BJP gives Deputy CM Post offer to Shivsena
 
संबंधित बातम्या

Saam TV Live