भाजप सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केलं - कमलनाथ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 एप्रिल 2020

मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पडण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पडण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीला भाजप कारणीभूत आहे. संसदेचे अधिवेशन केवळ मध्य प्रदेशमधील अधिवेशन सुरू राहावे, यासाठी सुरू ठेवण्यात आले होते. त्यातून कॉंग्रेसच्या सरकारला पाडणे हाच भाजपचा डाव होता, असे त्यांनी सांगितले.

कमलनाथ यांनी पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्शद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, की मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यास 24 मार्च तारीख का उजडू दिली? मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकारवर फेब्रुवारीपासून डोळा ठेवूनच हे करण्यात आले होते. भाजपचे सरकार मध्य प्रदेशमध्ये 23 मार्चला सत्तेवर आले आणि दुसऱ्याच दिवशी 24 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या तीन केसेस होत्या. परंतु, सरकारने 24 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला नाही. त्यामुळे ही संख्या 175 टक्‍क्‍यांनी वाढून 536 वर पोचली. 

जगभरातील इतर देश कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते. कोरोनामुळे ओडिशा आणि छत्तीसगढ विधानसभा तहकूब करण्यात आल्या. मात्र 26 मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभा तहकूब करण्यात आल्यानंतर भाजपने टीका केली, याकडेही कमलनाथ यांनी लक्ष वेधले.

Web Title - marathi news  BJP government ignores Corona - says Kamal Nath


संबंधित बातम्या

Saam TV Live