"अध्यक्ष मिळत नाही आणि निघाले पालिकेच्या मिशनवर"

"अध्यक्ष मिळत नाही आणि निघाले पालिकेच्या मिशनवर"

मुंबई : राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५०  जिंकू...आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असे म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन २०२२ ची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू...आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!

— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 1, 2020

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. त्यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबई पालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत, असे आवाहन केले होते. 

दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे.येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत,  असे आवाहन पवार यांनी केले होते. महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे पवार यांनी जाहीर केले होते. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या या विधानाची आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटद्वारे खिल्ली उडवली. 

Web Title  bjp leader ashish shelar ridicules ajit pawar claim

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com