"म्हणे बोलता बोलता निघालं असेल..  त्यांनी माफी मागितली, विषय संपला.." - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

"बोलता बोलता चूकून एखादं वाक्य तोंडातून बाहेर पडलं असेल" - चंद्रकांत पाटील

दहीहंडीच्या कार्यक्रमात तरुणींबाबत मुक्ताफळं उधळणारे दयावान आमदार राम कदम यांची पाठराखण करण्याकरता, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.

"बोलता बोलता चूकून एखादं वाक्य तोंडातून बाहेर पडलं असेल, असं सांगताना राम कदमांनी जाहीर माफी मागितल्याने, विषय संपला पाहिजे", असंही मत व्यक्त केलं. मात्र लाखो नागरिकांचं प्रतिनिधीत्व करणारा एखादा आमदार असं बेताल वक्तव्य कसा करु शकतो आणि त्याच्या पक्षातील ज्येष्ठ नेते अशा वायफळ बडबड करणाऱ्या आमदाराची पाठराखण कशी करु शकतात, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

WEBTITLE : MARATHI NEWS BJP LEADER CHANDRAKANT PATIL ON RAM KADAMS CONTROVERSIAL STATEMENT 


संबंधित बातम्या

Saam TV Live