उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याच्या प्रकरणावर चंद्रकांत पाटील अखेर बोलले...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 एप्रिल 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषेदवर राज्यपाल नियुक्त आमदार होण्यास भाजपची हरकत नाही. पण त्यांनी याआधीच विधान परिषद निवडणूक का लढवली नाही?

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषेदवर राज्यपाल नियुक्त आमदार होण्यास भाजपची हरकत नाही. पण त्यांनी याआधीच विधान परिषद निवडणूक का लढवली नाही? हे सगळं आत्ताच का, असे सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत.

ठाकरे यांच्या नियुक्तीला राज्यपाल अद्याप नियुक्ती देत नसल्याने शिवसेना आता त्याविषयी आक्रमक झाली आहे. भाजपने शिवसेना ही राज्यपालांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. पाटील यांनी भाजपचा विरोध नाही, असे स्पष्ट केले तरी याबाबत आता आणखी रण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाटील आणि फडणवीस यांनीच ठाकरे यांना आमदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली होती. त्यावर विचारले असता काकडे यांचे मत म्हणजे पक्षाची भूमिका असे नाही, एवढे सांगून त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त  आमदार करण्याचे प्रकरण हे टाळता आले असते. त्यांच्या पदाला २८ मे पर्यत धोका नाही. मग दोन महिन्यांआधी शिफारस करण्याची गरज का आहे? आमचा विरोध नाही. याबाबत महाविकास आघाडीने राजकारण सुरू केले, अशा ठपका त्यांनी ठेवला.

भाजपच्या राज्यातील नेत्यांनी कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंडाला मदत करण्यासाठी आवाहन सुरू केले आहे. सीएम फंडाऐवजी पंतप्रधान फंडाला मदतीच्या या पुढाकारामुळे भाजप नेते ट्रोल होत आहेत. त्यावर विचारले असता आम्ही आम्ही काय पाकिस्तान पंतप्रधानांच्या फंडात पैसे भरायला सांगत नाहीत, असा खुलासा त्यांनी त्यावर केला. उलट केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

पुण्यातील कोरोनाच्या संकटाबाबत पाटील यांनी महापालिका आय़ुक्तांशी चर्चा करून काही सूचना केल्या. याबाबत बोलताना ते म्हणाले की पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी काय केल आहे आणि काय केलं पाहिजे यावर त्यांना आमच्या सूचना दिल्या.  पुण्यातील काही वॉर्डांतील परिस्थिती गंभीर आहे. - होम गार्ड, एसआरपीएफ यांना लोक घाबरतात,याबाबत पोलीस आयुक्तांनी निर्णय घ्यावा.  पुण्यात काही ठिकाणी वॉर्डात भिलवाडा पॅटर्न राबवता येईल का याचीही चर्चा झाली. अशा ठिकाणच्या लोकांना १० दिवसाच रेशन देऊन त्यांना घरातच बसवता येईल का, अशी सूचना त्यांनी केली. 


संबंधित बातम्या

Saam TV Live