...तर नवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडून टाकू; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी म्हटले आहे.

आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी सिद्धूचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु, पोलिसांनी त्यांना रोखले. सिद्धू यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जमीतुल उलमाचे मुंबई अध्यक्षांनीही मौलाना कासमी यांनीही सिद्धू यांच्यावर टीका केली. मोर्चादरम्यान आजम म्हणाले, 'आम्ही जागोजागी धरणे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू.'

दरम्यान, सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाज्वा यांना मारलेल्या मिठीचे प्रकरण आता न्यायालयात पोचले आहे. मुझफ्फरपूरमधील वकील सुधीरकुमार ओझा यांनी या संदर्भात मुख्य न्यायदंडाधिकारी हरी प्रसाद यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. या संदर्भात 24 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी गेले असताना सिद्धू यांनी जनरल बाज्वा यांची गळाभेट घेतली तसेच पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे "अध्यक्ष' महसूद खान यांच्याशेजारी सिद्धू बसल्याचे आपण वाहिन्यांवर पाहिल्याचे ओझा यांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारत शोकसागरात बुडाला असताना, सिद्धू यांनी असे वर्तन केले. त्यांची ही वर्तणूक हुतात्म्यांचा अवमान करणारी आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला असल्याचेही ओझा यांनी नमूद केले आहे.  

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यानंतर सर्वांच्याच टीकेचे धनी बनलेल्या सिद्धू यांनी सर्वांना योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ, असे सांगितले. ‘‘ज्या वेळी प्रतिक्रिया देण्याची गरज असेल, त्या वेळी मी ती नक्कीच देईन आणि ती अत्यंत प्रखर प्रतिक्रिया असेल,'' असे सिद्धू चंडीगड येथे बोलताना म्हणाले. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाऊन आलेल्या सिद्धू यांच्यावर सामान्य नागरिक, भाजप यांच्याबरोबरच काँग्रेसमधूनही टीका होत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live