मोठी बातमी : फायरब्रॅड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

मोठी बातमी : फायरब्रॅड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

मुंबई - काल संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पेटताना दिसतंय. भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील घाटकोपरमधल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन राम कदम यांनी तक्रार दखल केली आहे. त्यामुळे उदयनराजे यांना संजय राऊत यांनी यांनी दिलेल्या आव्हानानंतर राम कदम आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. 'शिवाजी महाराज की जय', याचसोबत काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले पाहिजेत अशा घोषणा देखील याठिकाणी देण्यात आल्या.  

राम कदम यांची भूमिका काय ?

"संजय राऊत यांच्या वक्तव्याने उदयनराजे यांच्या आईला काय वाटलं असेल? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. उदयनराजे यांनी ते कुणाचे पुत्र आहेत, कोणत्या कुळात जन्म झालाय असं आपल्या मातोश्रींना विचारावं का ? असं देखील राम कदम म्हणालेत. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत वेदनादायक आहे. या वक्तव्याची आम्ही निंदा करतो आणि पोलिसांना संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची आम्ही मागणी करत आहोत. याचसोबत संजय राऊत यांना अटक करण्याची देखील मागणी राम कदम यांनी केली आहे. संजय राऊत यांनी कालच्या त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी देखील राम कदम यांनी केलीये.

काय आहे प्रकरण ?

हा संपूर्ण वाद सुरु झाला 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तिकेवरून. या पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करण्यात आली आहे. या पुस्तिकेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील उत्तर दिलं. उदयनराजे यांनी या पुस्तकाबद्दल मत मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षावर टीका केली. या टीकेनंतर काल संजय राऊत यांनी एका प्रकट मुलाखतीत उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. 

Web Title bjp leader starts agitation against sanjay raut lodge complain against raut ghatkopar police

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com