वंचित बहुजन आघाडीला भाजपकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची मदत करत असल्याचा आरोप होत असताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी भाजपने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही नवी खेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला भाजपकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदाराची नियुक्ती करायची आहे. त्यासाठी भाजपकडून प्रकाश आंबेडकरांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना वंचितसोबत चर्चा करण्यास सांगितले असताना भाजपने काँग्रेसला येथेही चितपट केले आहे. काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे प्रयत्न असताना, भाजप मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यासाठी, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्याला चर्चा करण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या आहेत. भाजपाचे नेते लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: BJP likely to appoint Prakash Ambedkar as Rajya Sabha MP

संबंधित बातम्या

Saam TV Live