भाजपच्या हातून झारखंड सुद्धा गेलं?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 23 डिसेंबर 2019

झारखंड : महाराष्ट्रात सत्तेची खुर्ची खालसा झाल्यानंतर, आता भाजपच्या हातून झारखंडही गेल्यातच जमा आहे... भाजपासह काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चासाठी महत्त्वाच्या असलेल्या झारखंड विधानसभेत सत्तांतराचे संकेत दिसतायत... झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. .. काँग्रेस-जेएमएमनं यंदा मुसंडी मारली असून, 40 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतलीय... तर 30 जागांपर्यंत भाजपची घसरण झालीय... जेएमएमचे हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा.. आरजेडी नेते तेजस्वी यादवांनी केलाय.

हे ही पाहा - 

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची पिछेहाट सुरुच आहे.  भाजपच्या पराभवाची नेमकी कारणं काय?, याची आता चर्चा सुरु झाली आङे. 
लोकसभेच्या प्रचंड यशानंतर का झाली पिछेहाट?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. 

मार्च 2018मध्ये भाजपची देशाच्या किती राज्यांमध्ये सत्ता होती. आणि आता गेल्याच महिन्यात नोव्हेंबरमध्ये भाजपनं किती राज्य गमावली आहे, हे आपल्याला पाहायला मिळू शकले. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा येवूनही भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आलं नाही. तसंच आज जे निकाल झारखंडमधून येत आहेत, ते पाहत तिथेही भाजपची सत्ता येण्याची शक्यता कमीच आहे. 

Web title -  bjp lose in assembly election of zarkhand

संबंधित बातम्या

Saam TV Live