उत्तराखंडचा उद्दाम भाजप आमदार ; ४-४ बंदुका नाचवतानाचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

दारु पिऊन झिंगाट झालेले हे आहेत भारताचे आदरणीय लोकप्रतिनिधी प्रणव सिंह चँपियन. एका हातात दारुचा ग्लास, दुसऱ्या बंदुक.. कधी दोन्ही हातात बंदुका.. त्यात आजुबाजुला चेव आलेले समर्थक. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नशेत झिंगलेल्या या भाजप आमदाराला कसलंही भान राहिलं नव्हतं. ठणाठणा वाजणाऱ्या म्यझिकमुळ सगळ्यांना जास्तच चेव चढला होता. बरं या आमदाराच्या बाबतीत हे काही पहिल्यांदा नाही घडलंय. बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळं प्रणव सिंह आधीच पक्षातून निलंबित आहेत. पायाचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते.

दारु पिऊन झिंगाट झालेले हे आहेत भारताचे आदरणीय लोकप्रतिनिधी प्रणव सिंह चँपियन. एका हातात दारुचा ग्लास, दुसऱ्या बंदुक.. कधी दोन्ही हातात बंदुका.. त्यात आजुबाजुला चेव आलेले समर्थक. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नशेत झिंगलेल्या या भाजप आमदाराला कसलंही भान राहिलं नव्हतं. ठणाठणा वाजणाऱ्या म्यझिकमुळ सगळ्यांना जास्तच चेव चढला होता. बरं या आमदाराच्या बाबतीत हे काही पहिल्यांदा नाही घडलंय. बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळं प्रणव सिंह आधीच पक्षातून निलंबित आहेत. पायाचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते. पण सेलिब्रेशनच्या नादात रंगाचा बेरंग झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही.

 

 

बरं आजुबाजुची पिलावळं प्रणव सिंहांना आणखीच चिथवत होती. उत्तराखंडमध्ये हे फक्त तुम्हीच करु शकता असं ते म्हणत होते, त्यावर प्रणव सिंहांचा आणखीच उत आला, फक्त उत्तराखंड नाही, तर संपुर्ण भारतात असं कोणी करु शकत नाही असं म्हणत त्यांनी तोंडात बंदुक धरली. 

लोकप्रतिनिधी नेमकं जसं वागलं पाहिजे त्याच्या थेट उलटं प्रणव सिंह आजपर्यंत वागत आलेत. त्यामुळं अशा बेजबाबदार आणि उद्दाम आमदाराला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरतेय.

WebTitle : marathi news bjp mla caught dancing with 4 guns in hand video viral

 


संबंधित बातम्या

Saam TV Live