पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मे 2019

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही व्यक्तिकेंद्रित नाही. तर विचारांवर उभा राहिलेला हा पक्ष म्हणून आहे. हा पक्ष केवळ नरेंद्र मोदी-अमित शहांचा नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच हा पक्ष ना कधी अडवणींचा बनू शकला ना कधी अटलजींचा बनला. म्हणून भाजप हा पक्ष केवळ मोदी-शहांचा बनू शकत नाही, कारण हा पक्ष व्यक्तिकेंद्रित नाही, असेही ते म्हणाले.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सर्वाधिक मताधिक्याने विजय होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन होईल. आम्ही आता भाजपचे नाहीतर एनडीएचे सरकार स्थापन करू. तसेच जर आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलो तरीदेखील आम्ही एनडीएचे सरकार स्थापन केल्याचे मानून त्यानुसार एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहोत. 

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. तशी माझी इच्छा किंवा त्याबाबत माझा कोणाताही अजेंडाही नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी पंतप्रधानपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच नरेंद्र मोदी हे आमचे आहेत. ते पंतप्रधान होतील, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP is not only Party of Modi and Amit Shah says Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Saam TV Live