BJP शेवटच्या टप्प्यात बारामतीत लावणार प्रचाराचा धडाका

BJP शेवटच्या टप्प्यात बारामतीत लावणार प्रचाराचा धडाका

बारामती : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघावर शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील तर दुसरीकडे राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा बारामतीत आयोजित करुन बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरणनिर्मितीचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे.

कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भाजपकडून सुरु असून 19 एप्रिलला अमित शहा तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिलला नितीन गडकरी यांची सभा मतदारसंघात होणार आहे.

दरम्यान स्मृती ईराणी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा बारामती लोकसभा मतदारसंघात घेण्याचे निश्चित झाले आहे. भाजपचे वासुदेव काळे यांनी या बाबत माहिती दिली.

बारामतीच्या शारदा प्रांगणात 19 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अमित शहा सभा घेणार आहेत. 21 एप्रिल रोजी नितीन गडकरी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. बारामती शहर किंवा सासवड मध्ये त्यांची सभा होणार आहे. या बाबत दोन दिवसात स्थळ निश्चिती होईल असे काळे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची 21 एप्रिल रोजी हिंजवडी परिसरात होणार आहे. ईराणी यांच्या दोन सभा याच परिसरात करण्याचे भाजपचे नियोजन आहे. दुस-या सभेचे ठिकाण ठरविण्याचे काम सुरु आहे. तर योगी आदित्यनाथ यांची सभा 19 एप्रिल रोजी खडकवासला येथे होणार आहे.

दुसरीकडे राज्यस्तरीय नेत्यांपैकी पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन, पाशा पटेल, चंद्रकांत पाटील यांच्या लोकसभा  मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. स्वताः चंद्रकांत पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडत असून थेट मुख्यमंत्री व अमित  शहा यांच्याशी त्यांची या बाबत चर्चा होत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

Web Title : marathi news bjp political campaigning for baramati seat loksabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com