VIDEO | अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं; सेना- भाजप वादावरून शहांचा मुंबईदौरा लांबणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

 नवी मुंबई : सत्तास्थापनेवरुन युतीतले मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेतला वाद कायम आहे.  मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहांनी सध्या मुंबईत येणं टाळलंय. जोवर भाजप आणि शिवसेनेतील वादावर तोडगा निघत नाही, तोवर मुंबईत न येण्यावर अमित शहा ठाम आहेत. तसंच सत्तास्थापनेचा पेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वानेच सोडवावा, त्यात केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग अजिबात असणार नाही. असंही शहांनी राज्यातील नेत्यांना कळवल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली. 

Web Title : BJP President Amit Shah Cancelled His Mumbai Tour

संबंधित बातम्या

Saam TV Live