VIDEO | राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं राज्यभरात घंटानाद आंदोलन

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

मुंबईच्या सायन ते वडाळा दरम्यानही घंटानाद आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली घंटानाद आंदोलन केलंय. राज्यातील मंदिर उघण्यासाठी यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली. 

राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडावी यासाठी आज राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे. इकडे राम कदम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये भेटही घेतलीये. मंदिरात जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी पोलिस स्टेशनला आधी भेट दिली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त आहे. यानंतर त्यांनी सिद्धिविनायक मंदिरासमोर निदर्शनं करण्यात आली. 

मुंबईच्या सायन ते वडाळा दरम्यानही घंटानाद आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली घंटानाद आंदोलन केलंय. राज्यातील मंदिर उघण्यासाठी यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली. 

पाहा आंदोलनाचा व्हिडिओ -

पुण्यातही भाजपकडून जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आलं... पुण्यातील सारसबागेच्या प्रवेशद्वाराजवळ शहर भाजपकडून आंदोलन करण्यात आलं.. यावेळी 'दार उघड उद्धवा' अशी हाक देत धार्मिक स्थळं आणि मंदीरं सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

 

सुशांतसिह मृत्यू प्रकरणी ट्विटरद्वारे राजकीय चिखलफेक सुरू

नाशिकमध्येही घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात.  नाशिकच्या रामकुंडावर हे घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. जोरदार घंटानाद करत घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 

राज्यातील मंदीर उघण्यासाठी कोल्हापूरमध्ये भाजपाने आंदोलन केले. अंबाबाईच्या मंदीरासमोर झालेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दार उघड उध्दवा, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांना यावेळी जोरदार निदर्शनं केली. 

अंबरनाथमध्ये स्वानंद गणपती मंदिराबाहेर घंटानाद करण्यात आलाय. मंदिरं उघण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनं केलीत. दारुची दुकानं उघडली जातात, मॉल उघण्यासही परवानगी दिली जाते. मग मंदिर का बंद ठेवण्यात आली आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय.  मंदिराचे दार उघडून टाळ, मृदुंग वाजवत आरती करण्यात आली. यासह अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live