नवी मुंबईत भाजप नेत्यांनी मोठा घोटाळा केल्याचा काँग्रेसचा आरोप 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

नवी मुंबईत राज्य सरकारनं मोठा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 1767 कोटींच्या भूखंडाची अवघ्या साडेतीन कोटींमध्ये विक्री केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 8 शेतकरी कुटुंबाना मुंबई विमानतळाजवळ खारघर या ठिकाणी 24 एकर जमीन देण्यात आली होती.

या आठ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज बिल्डर मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी 15 लाख प्रति एकर कवडीमोल किंमतीनं आणि दमदाटीने खरेदी केली असा आरोप काँग्रेसनं केलाय. 1767 कोटी रुपयांची जमीन फक्त 3 करोड 60 लाख रुपयात जबरजास्तीनं खरेदी करण्यात आली असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्य़ाची मागणी केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live