'संपर्क फॉर समर्थन'; अमित शहा भेटणार उद्धव ठाकरेंना.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर भाजपकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नाराज मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'संपर्क फॉर समर्थन' या अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उद्या (बुधवार) 'मातोश्री'वर जाणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष भाजपवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे दिसतही होती. तसेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून रणनिती आखली जात आहे. तसेच शिवसेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता नाराज झालेल्या शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करणार आहेत. 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला मोठा राजकीय शत्रू मानले होते. तसेच देशाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडगोळीची गरज नाही. मात्र, देशातील जनता काँग्रेस किंवा जेडीएस नेते एचडी देवेगौडा यांना मते देऊ शकते. शिवसेना 'एकला चलो रे'ची भूमिका बदलेल असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live