VIDEO | संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, आता तरी गप बसा - चंद्रकांत पाटील

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019


राज्यातल्या दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांचा विचार केला नाही. शिवसेनेच्या या आततायीपणाला शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार आहेत. संजय राऊतांना शिवसेनेची वाट लावली, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातल्या सत्ताकारणाला आज पहाटे लागलेल्या नाट्यमय वळणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी हिंदुत्व सोडलं, शिवाजी महाराजांना सोडलं.
 

मुंबई: शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी हिंदुत्व सोडलं, शिवाजी महाराजांना सोडलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांचा विचार केला नाही. शिवसेनेच्या या आततायीपणाला शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार आहेत. संजय राऊतांना शिवसेनेची वाट लावली, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातल्या सत्ताकारणाला आज पहाटे लागलेल्या नाट्यमय वळणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, '२४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. त्यानंतर जनतेची ही अपेक्षा होती की जनतेने दिलेल्या जनादेशाचा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आदर करावा. पण शिवसेनेने पहिल्या दिवसापासून सर्व पर्याय खुले असल्याची भाषा केली. २९ ऑक्टोबरला आमची पहिली बैठक होती तीही रद्द केली. शिवसेना पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास उत्सुकच नव्हती. मात्र राष्ट्रवादीसोबत बैठकांवर बैठका घेत होते. भारतीय जनता पार्टीला त्यांना भेटायला वेळ नव्हता, पण इतर सर्वांना भेटण्यासाठी वेळ होता. राज्यातल्या जनतेने हा खेळ पाहिला. शेवटी भाजपने सर्वाधिक जागा असूनही सरकार स्थापण्यास आपण असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितले.'

शिवसेनेची संजय राऊतांनी वाट लावली. संजय राऊतांच्या तोंडात पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. खंजीर त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खुपसला आहे. शिवसैनिक त्यासाठी त्यांना माफ करणार नाहीत. त्यांनी किती टोकाची भाषा गेल्या महिनाभरात केली, ते राज्यातली जनता पाहात होती. आम्ही मातोश्रींची गरिमा राखली. आमचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीला जात होते. पण उद्धवजींना मातोश्री सोडून सिल्व्हर ओक हे शरद पवारांचं निवासस्थान गाठावं लागलं. तेही एकवेळ ठिक होतं, पण हॉटेलमध्ये जावं लागलं. आम्हाला याची लाज वाटते. ही वेळ राउतांनी शिवसेनेवर आणली, अशा शब्दात पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

WebTittle :  bjp state president chandrakant patil criticises shiv sena leader sanjay raut


संबंधित बातम्या

Saam TV Live