चोवीस तास उलटूनही भाजपची वेबसाईट गंडलेलीच!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची वेबसाईट काल अज्ञात हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. वेबसाईट हॅक करून हॅकर्सकडून या वेबसाईटवर अश्लील छायाचित्रेही अपलोड करण्यात आली होती. 

याप्रकारानंतर वेबसाईट हॅक झाल्यानंतर ती तातडीने डाऊन करण्यात आली. पण चोवीस तास उलटूनही वेबसाईट सुरळीत सुरु झालेली नाही.त्याचबरोबर कालपासून 'वुई विल बॅक सून' असे दाखवत आहे. यावरून भाजपला नेटीझन्सनी चांगलेच ट्रोल केले असून विरोधी पक्षही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

काल सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ही वेबसाईट हॅक करण्यात आली होती. वेबसाईट उघडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडिओ समोर येत होता. या व्हिडीओसोबत अश्लील शब्दांचा वापर केला गेला असल्याचे निदर्शनास आले आहे.  

भाजपची वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नेटीझन्सना ट्विट करून भाजपची वेबसाईट बघण्याचे आवाहन केले. भाजपची http://www.bjp.org/ ही अधिकृत वेबसाईट आहे. आतापर्यंत भाजपकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live