भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळेल : पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

बसिरहाट : मतदानाचे सर्व कल भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळेल, असे सांगत आहेत. पण दीदी, तुमचे नैराश्य आणि बंगालच्या जनतेचा पाठिंबा पाहता मी आता म्हणू शकतो, की बंगालमध्ये आम्हाला 300 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) व्यक्त केला. 

पश्चिम बंगालमधील बसिरहाट येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, दीदी, तुम्ही स्वत: कलाकार आहात. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही माझे सर्वांत मोठं चित्र तयार करा. 23 मेला माझ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर माझे जे चित्र तुम्ही तयार केले असेल ते मला भेट म्हणून द्या. मी तुमच्यावर कोणतीही तक्रार (एफआयआर) करणार नाही. 

तसेच दीदीजी, ज्या मुलींना तुम्ही तुरुंगात टाकण्याचे काम करत आहात. त्याच मुली तुम्हाला चांगला धडा शिकवतील. एका चित्रासाठी इतका राग?, असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केला. 

Web Title: marathi news bjp will win loksabha election with full majority 

संबंधित बातम्या

Saam TV Live