भाजपला तीनशेपेक्षा जास्‍त जागा आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल - नितीन गडकरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

नागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये थोडाफार फटका बसणार असला तरी त्याची भरपाई बंगालमधून भरून निघणार असल्याचे सांगितले. 

नागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये थोडाफार फटका बसणार असला तरी त्याची भरपाई बंगालमधून भरून निघणार असल्याचे सांगितले. 

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शिल्लक राहिला आहे. नितीन गडकरी मध्य प्रदेशातील विविध लोकसभा मतरासंघांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी इंदूर आणि देवास या दोन मतदारसंघात सभा घेतल्या. या दोन्ही मतदारसंघात मराठी माणसांचा टक्का मोठा आहे. या दोन्ही मतदारसंघातील अनेक रस्ते त्यांनी प्रशस्त केलेत तसेच राष्ट्रीय महामार्गांना जोडले आहेत.  त्यामुळे गडकरी यांच्याविषयी येथील मतदारांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग वाहतुकीची निर्मिती, त्यामुळे फायदे आणि तसेच भविष्यात होणारा विकास याची माहिती त्यांनी दिली. मध्य प्रदेशातील मुंबई आणि दिल्लीला थेट जोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्गांची यादीही त्यांनी सादर केली. 

नागपूर ते उज्जैन या दरम्यानच्या प्रवासात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचे केंद्रात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंग होणार असल्याचे सांगितले. नागपूरमध्ये आपण सुमारे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्‍याने निवडून येणार असल्याचे सांगितले. पूर्व आणि दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्‍य मिळेल. दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरमधून सुमारे चाळीस ते पन्नास हजारांचे मताधिक्‍य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात आपला फोकस रोजगार निर्मिती आणि स्थानिकस्तरावर उद्योग विकसित करण्यावर राहील. काही योजनाही आपण निश्‍चित केल्या आहेत. यात सीएनजीची निर्मिती व दुग्ध व्यवसायावर भर राहील. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती होईल आणि शेतकरीसुद्धा समृद्ध होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Lmarathi news bjp will win more than 300 seats in loksabha says nitin gadkari 


संबंधित बातम्या

Saam TV Live