राम मंदिरावरुन भाजपचा जल्लोष, शिवसेना संभ्रमात

साम टीव्ही
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020
 • भाजपचा जल्लोष, शिवसेना संभ्रमात
 • दिवाळी साजरी करण्याचं भाजपचं आवाहन
 • सोहळा कसा साजरा करावा यावरुन सेना पेचात 

राम मंदिर निर्माणासाठी शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक राहिली. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी अनेकदा अयोध्या वारी केली. पण आता राम मंदिरांचं भूमिपूजन होत असताना शिवेसना संभ्रमात आहे. तर दुसरीकडे भाजप दिवाळी साजरी करतंय.
अनेक वर्ष ज्या दिवसाची प्रतीक्षा होती. तो दिवस अखेर जवळ आलाय. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भूमिपूजन होतंय. आणि हा ऐतिहासिक दिवस भाजपने दिवाळ सणासारखाच साजरा करण्याचं ठरवलंय. मात्र या सगळ्यात भाजपचा कधीकाळचा मित्रपक्ष शिवसेना संभ्रमात आहे. 

भाजप दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असताना हा सोहळा नेमका कसा साजरा करावा? हे शिवसेनेचं काही ठरलेलं नाही. 

भाजपने राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा हायजॅक केल्यानंतर अर्थातच शिवसेनेची राजकीय कोंडी होतेय. आणि विरोधकही तोंडसुख घेतायत. या सगळ्या डिवचण्याच्या खेळात भाजप मात्र दिवाळीच्या तयारीला लागलेय. 

हेही वाचा -

दूध आंदोलनावर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली, खालच्या पातळीवर जाऊन टीका

 

राज्यभर भाजपची दिवाळी

 • गिरगावात प्रत्येक मंदिरात भूमिपूजनावेळी दीपोत्सव 
 • उत्तर मुंबईत सर्व नगरसेवक कार्यालये दिव्यांनी सजवणार
 • उत्तर मध्य मुंबईत दिव्यांची आरास, आरती, रंगावली आणि मंदिरांवर पुष्पवर्षाव 
 • विलेपार्लेमध्ये प्रत्येक चौकात भव्य श्रीरामपूजन
 • एलईडी स्क्रिनवर अयोध्येतून थेट प्रक्षेपण 
 • प्रत्येक चौकात भाजप पेढे वाटणार
 • उत्तर पश्चिम मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये श्रीरामपूजन आणि मिठाई वाटप
 • देश राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा अनुभवत असताना, राज्यात भाजप शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न करतेय... भाजपने दिवाळीची तयारी केलेय.. आता शिवसेना या दिवाळीत फटाके फोडणार? की चिडीचूप राहणं पसंत करणार? हे तेव्हाच कळेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live