भाजप आमदाराकडून महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

अहमदाबाद : पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला भाजप आमदाराने भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 

 

अहमदाबाद : पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला भाजप आमदाराने भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 

 

अहमदाबाद शहरातील नारोडा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार बलराम थवानी यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नितू तजवानी असे या महिलेचे नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या आहेत. त्या थवानी यांच्या कार्यालयाबाहेर पाण्यासाठी आंदोलन करत होत्या. 

आमदार थवानी यांच्यासह त्यांचे सहकारी या महिलेला रस्त्यावर पाडून लाथा मारत होते. या मारहाणीनंतर थवानी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. भाजप आमदाराच्या या कृत्याचे काँग्रेस नेत्याकडून निषेध करण्यात आला आहे. 

या मारहाणीनंतर नितू तेजवानी म्हणाल्या, की मी स्थानिक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. पण, त्यांनी माझे काही ऐकून घेण्यापूर्वीच मारहाणीला सुरवात केली. मी खाली पडल्यानंतर त्यांना लाथाही मारल्या. माझ्या पतीलाही त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. मला मोदींना विचारायचे आहे, की तुमच्या राज्यात महिला सुरक्षित आहेत का?

Web Title: BJPs Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader Nitu Tejwani when she went to his office


संबंधित बातम्या

Saam TV Live