भाजपचे अध्यक्ष बनलेले नड्डा नेमके कोण आहेत?

भाजपचे अध्यक्ष बनलेले नड्डा नेमके कोण आहेत?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जागी नवे अध्यक्ष म्हणून जे.पी.नड्डा यांनी निवड झाली. शहा हे अध्यक्ष असताना त्यांच्या हाताखाली गेल्या सात-आठ महिन्यापासून ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपद सांभाळणे तसे सोपे काम नाही.

या पक्षाला मोठी परंपरा आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, राजनाथसिंह, त्यानंतर म्हणजे 2014 मध्ये मोदींच्या लाटेत अमित शहा यांची निवड झाली. म्हणजेच या पक्षाचे अध्यक्षपक्ष दिग्गज नेत्यांनी सांभाळले आहे. 

वास्तविक जनसंघानंतर भाजप आणि पणतीनंतर कमळ आले. भाजप आणि कमळाने देशात इतिहास घडविला. भाजपचे पहिले अध्यक्ष वाजपेयी बनले. त्यानंतर या पदावर विराजमान झाले ते अडवानी. 1980 ते 2020 असा भाजपचा प्रवास राहिला. या वर्षात म्हणजे गेल्या 39 वर्षात अडवाणी हे तीनवेळा पक्षाचे अध्यक्ष बनले.

1986 ते1991, 1993 ते1998 आणि 2004 ते 2005 या काळात ते अध्यक्ष होते.अकरा वर्षे अध्यक्ष राहिलेल्या अडवाणींनी पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. मग ते रामजन्मभूमी आंदोलन असेल किंवा भारत यात्रा. 

भाजपच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय राजकारणात आयुष्य खर्ची केलेल्या अडवानींचा झंझावात नेहमीच लक्षात राहणारा आहे. पक्षाची पाळेमुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात देशभर रूजली असे म्हणावे लागेल. 

कॉंग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या देशातील जनतेने भाजपला 2014 मध्ये संधी दिली. या पक्षाला बहुमत मिळाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्यावेळी राजनाथसिंह हे अध्यक्ष होते. पुढे मोदी सरकार आल्यानंतर सिंह हे गृहमंत्री बनले आणि त्यांच्या जागी गडकरी आले.

मात्र ते ही पदावर फार काळ टिकले नाहीत. पुढे त्यांची जागा अमित शहा यांनी घेतली. त्यांना सलग दोन टर्म अध्यक्षपद मिळाले. आता ते केंद्रात गृहमंत्री बनल्याने नड्डा हे अध्यक्ष बनले. गेल्या सात महिन्यापासून नड्डा यांनी शहा यांच्या हाताखाली धडे घेतले आहेत. पक्षासाठी त्यांनीही देशभर भ्रमंती केली आहे. 

भाजपचे अध्यक्ष बनलेले नड्डा नेमके कोण आहेत ? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. 

जे.पी.नड्डा म्हणजे जगत प्रकाश नड्डा असे त्यांचे पूर्ण नाव. 2 डिसेंबर1960 हा जन्मदिवस. नरेनलाल आणि कृष्णा हे त्यांचे पातापिता. पाटण्यातील सेंट. झेवियर मध्ये त्यांचे शिक्षण झाले. पाटना कॉलेजमधन बीए झाले. पुढे हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

ते पेशाने वकील आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मल्लिका असे आहे. त्यांना दोन मुले आहेत. मध्यप्रदेशातील भाजपच्या माजी खासदार जयश्री बॅनर्जी या त्यांच्या सासूबाई . दिल्लीत झालेल्या दिल्लीत झालेल्या अ.भा. ज्यूनियर स्विमिंग चॅम्पनशिपमध्ये त्यांनी बिहारचे नेतृत्वही केले होते. त्यांना पोहण्याची आवड आहे. 

अभाविपमध्ये काम करीत असताना ते 1993 मध्ये हिमाचल प्रदेशमधे आमदार बनले. त्यानंतर पुन्हा 1998 आणि 2007 मध्ये आमदार बनले. मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते.

त्यांना आणीबाणीत कारावास झाला होता. 2010 मध्ये ते राष्ट्रीय राजकारणात आले आणि त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात जे काही नेते यशस्वी झाले आहेत त्यामध्ये नड्डा यांचाही समावेश करावा लागेल. 

गडकरी पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी नड्डा यांना पक्षाचे सरचिटणीस केले. त्यांनी पक्षासाठी राष्ट्रीयस्तरावर महत्वाची भूमिका बजावल्या. 2012 मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभा सदस्य केले. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये नड्डा हे आरोग्यमंत्री बनले.

दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना मंत्री केले नाही पण, पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. नड्डा यांनी मोदी-शहांचा विश्वास जिंकला आहे. जलतरणपटू, अभाविपचा कार्यकर्ता, आमदार, राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com