राहुल गांधींच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरुन लोकसभेत भाजपचा गोंधळ

राहुल गांधींच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरुन लोकसभेत भाजपचा गोंधळ

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून लोकसभेत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. एका सभेत राहुल गांधी यांनी देशात मेक इन इंडिया नाही रेप इन इंडिया सुरू आहे असं वादग्रस्त विधान केलं.  त्यांच्या या विधानावरून भाजप खासदार चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. राहुल गांधींविरोधात भाजप खासदारांनी जोरदार मोर्चा उघडला. राहुल गांधींनी देशाची मान खाली घातली. त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केलीय. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला.  भाजपच्या सर्व महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजीही केली. 

काय होतं राहुल गांधींचं वक्तव्य?

‘उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या आमदाराने एका महिलेवर बलात्कार केला आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.’ अशा शब्दात केरळमधील वायनाडमध्ये खासदार राहुल गांधींनी टीका केली होती.

‘आता जिकडे बघाल, तिथे रेप इन इंडिया. पेपर उघडा, झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या आमदाराने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर गाडीचा अपघात झाला, नरेंद्र मोदी एक शब्दही नाही बोलले. प्रत्येक राज्यात रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी म्हणाले मुली शिकवा, मुली वाचवा, पण तुम्ही हे नाही सांगितलंत की कोणापासून वाचवायचं आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचं आहे’ असं राहुल गांधी झारखंडमधील गोडामध्ये बोलले होते.

स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाची खिल्ली उडवण्यात आली. इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे की भारतीय महिलांवर बलात्कार केला जावा, असं वक्तव्य नेता करत आहेत. हा राहुल गांधींचा संदेश देशातील जनतेला आहे का?’ असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला खासदारांनी केली. यामध्ये खासदार प्रज्ञासिंहचाही समावेश होता.

Web Title - BJP's Quarrel in Lok Sabha over Rahul Gandhi's rap in India statement

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com