VIDEO | भाजप नगरसेवक फुटण्याची शक्यता, भाजपला महापालिकेत सत्ता गमवण्याची भीती

VIDEO | भाजप नगरसेवक फुटण्याची शक्यता, भाजपला महापालिकेत सत्ता गमवण्याची भीती

नाशिक : भाजप नगरसेवकांच्या नातेवाईकांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानं भाजपमध्ये खळबळ उडालीय. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांच्या नातेवाईकांनी मुंबईत  संजय राऊत यांची भेट घेतलीय. भाजप नगरसेविका सुनीता पिंगळे यांचे पती ज्ञानेश्वर पिंगळे, नगरसेविका अनिता सातभाई यांचे पुत्र गणेश सातभाई, प्रियांका माने यांचे पती धनंजय माने, मच्छिंद्र सानप, विशाल संगमनेरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट घेतली.
आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या नातेवाईकांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानं भाजपमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
10 ते 12 बाळासाहेब सानप समर्थक भाजप नगरसेवक फुटण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आहे. सानप समर्थक नगरसेवक फुटल्यास भाजपला महापालिकेतील सत्ता गमावण्याची भीती आता वाढलीय.

राज्यामध्ये एकीकडे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाशिवआघाडी निर्माण होत असताना नाशिकमध्येदेखील महाशिवआघाडीचा ट्रेलर महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असले तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षात निर्माण झालेला कलह अद्याप सुटताना दिसत नाही. नगरसेवक फुटीच्या भीतीने त्यांची टूर घडत असतानाच शुक्रवारी दुपारी भाजपच्या पाच नगरसेवकांच्या नातेवाइकांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

संजय राऊत यांची भेट घेतलेल्यांमध्ये मखमलाबाद येथील नगरसेविका सुनीता पिंगळे यांचे पती ज्ञानेश्‍वर पिंगळे, जेल रोडच्या नगरसेविका अनिता सातभाई यांचे पुत्र गणेश, पंचवटी प्रभाग समितीच्या माजी सभापती प्रियंका माने यांचे पती धनंजय, नगरसेवक मच्छिंद्र सानप, नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापती विशाल संगमनेरे यांचा समावेश होता. पंचवटी विभागातील आणखी दोन महिला नगरसेविका सानप यांच्या सोबत असल्याचे बोलले जात आहे.

घडामोडींना वेग

    सानपसमर्थक नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे बोलले जात आहे. सानपसमर्थक आमदार तटस्थ राहिल्यास बहुमताची संख्या घटून विरोधकांची सत्ता सहज स्थापन होणे शक्‍य आहे. तर सभागृहात हजर राहून विरोधात मतदान केले तरी विरोधकांची सत्ता येणे शक्‍य आहे. असे झाल्यास भाजपला मोठा धक्का मानला जाईल. मात्र महापौर निवडणुकीला अद्याप सहा दिवस शिल्लक असल्याने तोपर्यंत काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सानप यांनी भेट घेतली, त्यात प्रत्यक्ष नगरसेवकांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे दुसरीकडे भाजपलादेखील घाबरविण्याचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. 

Web Title: marathi news bjp's some peoples meets sanjay raut 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com