तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - रुळांची तसेच सिग्नल यंत्रणेतील बिघाडांची दुरुस्ती आदी कामांसाठी रविवारी पश्‍चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, तर मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना नियोजन करूनच घराबाहेर पडावे लागेल. 

पश्‍चिम रेल्वे -

मुंबई - रुळांची तसेच सिग्नल यंत्रणेतील बिघाडांची दुरुस्ती आदी कामांसाठी रविवारी पश्‍चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, तर मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना नियोजन करूनच घराबाहेर पडावे लागेल. 

पश्‍चिम रेल्वे -

- बोरिवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक. 
- या कालावधीत अप दिशेवरील सर्व लोकल विरार-वसई येथून बोरिवलीपर्यंत धिम्या मार्गावर धावतील. 
- डाऊन मार्गावरील जलद लोकल बोरिवली ते वसई-विरारपर्यंत धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. 

मध्य रेल्वे -

- कल्याण-ठाणेदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 वाजेपर्यंत ब्लॉक 
- ब्लॉकदरम्यान सकाळी 10.48 ते 4.14 वाजेपर्यंत धिम्या मार्गावरील लोकल कल्याण येथून अप जलद मार्गावर मुलुंडपर्यंत वळवण्यात येतील. 
- या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांत थांबणार नाहीत. 
- या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून प्रवास करण्याची मुभा असेल. 
- रविवारी सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या सर्व जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, मुलुंड, भांडुप आणि दिवा स्थानकांत थांबतील. त्या 15 मिनिटे उशिराने पोहचतील. 
- सकाळी 11.23 ते सायंकाळी 4.02 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत थांबतील. 
- सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन आणि जलद मार्गावरील लोकल नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. 

ट्रान्स हार्बर -

- ठाणे-वाशी-नेरूळदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक 
- सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत ठाणे, वाशी, नेरूळ येथून सुटणाऱ्या लोकल; तसेच सकाळी 10.45 ते 4.09 वाजेपर्यंत वाशी, नेरूळ, ठाणे येथून सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. 


संबंधित बातम्या

Saam TV Live