दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उद्या (गुरुवारी) दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उद्या (गुरुवारी) दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

खालापूर टोल नाक्‍याच्या अगोदर "ओव्हर हेड गॅण्ट्री' बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम सुरू असताना पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहनांना शेडुंग फाटामार्गे जुन्या पुणे-मुंबई महामार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येणार आहे. या दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. हा मार्ग फक्त याच दरम्यान बंद राहणार आहे. दोन वाजल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला जाईल.

WebTitle : marathi news block on mumbai pune express way for two hours 


संबंधित बातम्या

Saam TV Live