( BLOG ) आम्ही सारे बाबासाहेबांचे.. - संदीप काळे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले.आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो.बजरंग बिहारी तिवारी,कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले.अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. एका चळवळीपेक्षा अधिक वेगाने, समाजपरिवर्तनाचे काम या विचार चिंतनातून घडते.मागे झालेली आणि पुढे होणारी सर्व संमेलन अशीच परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत.” 

“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले.आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो.बजरंग बिहारी तिवारी,कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले.अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. एका चळवळीपेक्षा अधिक वेगाने, समाजपरिवर्तनाचे काम या विचार चिंतनातून घडते.मागे झालेली आणि पुढे होणारी सर्व संमेलन अशीच परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत.” 

बाबासाहेब काय आहेत हे कळायला आत्मचिंतनाची व्यासंगी बैठक असावी लागते.बाबासाहेब यांना सतत आत्मसात करून माझे मलाच धन्य वाटू लागले आहे. माझी मेत्रीण जयंती मला सांगत होती. “मी एवढ्या डीपमध्ये जावून बाबासाहेब कधी अनुभवले नाही. मी गावकुसातून आल्यामुळे बाबासाहेब हे फक्त बोध धर्मांचे हे माझ्या मनावर कोरले होते” इथल्या वातावरणातून बाबासाहेब हे सर्वांचेच आहेत, किंभहुना आम्ही सारे बाबासाहेबांचे आहोत.हे मनोमनी वाटत होते. संमेलनात सहभागी झालेली माझी मैत्रीण जयंती कुळकर्णीचे हे मत बरेच काही सांगून जाते. 

राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार व्हावा यासाठी काही आंबेडकरी विचारवंत एकत्रित आले. आणि त्यांनी या संमेलनाची यशस्वी गुढी सर्व ठिकाणी उभी केली.या संमेलनातून राज्यभर मोठे विचारविनिमय घडून आले राज्यात आता अशा संमेलनाची खऱ्या अर्थाने गरज आहे.नांदेडला आम्ही आंबेडकर संमेलनाचे आयोजन केले होते.एक वेगळा अनुभव या निमिताने आला.एक मोठी चळवळ चालवल्या एवढे हे काम आहे. “जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.” हे बाबासाहेबांचे विचार प्रत्येक्षात उतरवण्यासाठी संमेलनाच्या माध्यमातून विचार पेरण्याचे काम जबरदस्तपणे झाले. 

श्रीपाद भालचंद्र जोशी सर,उत्तम कांबळे सर यासह काही समविचारी लोकांनी राज्यात एकत्रित येवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी पुढाकार घेतला. नागपूरला पहिले  व अन्य बाकी  चार ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलने झाल्यावर ५ वे संमेलन आम्ही नांदेडला घ्यायचे ठरवले.नांदेडला सामाजिक चळवळीतून काही घडवून आणायचे असेल तर नयन बाराहाते हे नाव आघाडीवर असते.नयन यांच्याशी जोशी सर आणि कांबळे सर यांनी संपर्क करून नांदेड ला संमेलन घेण्याबाबत चर्चा झाली नयन यांनी संध्याकाळी फोन करून आपल्याला नांदेडला संमेलन घ्यायचे हा विचार पुढे ठेवला मला ही वाटते काहीतरी छान या निमिताने करता येणार आहे आम्ही सर्वजण कामाला लागलो. 

राम शेवडीकर, प्रा. यशपाल भिंगे, प्रा. केशव देशमुख, प्रा. पी.विठल,शिवाजी आंबुलगेकर प्रा.राजेद्र गोणारकर प्राचार्य सुरेश सावंत,अशी नांदेडमधील अनेक दिग्गज मंडळी या संमेलनाच्या मोठ्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुढे आली. अगोदर दहाजण होते मग १०० जण कसे एकत्रित आले कळाले नाही. एक महिनाभर या संमेलनाची तयारी सुरु होती. माझ्यावर सर्व गेस्ट आणण्याची जबाबदारी होती.सर्व नावाची लिस्ट नयन यांनी माझ्या हाती दिली.एखान्द्या मुंबईच्या गेस्टला नांदेडला घेवून येयाचे म्हणजे सोपे काम नसतेच मोठी माणसे यांनीं दोन दिवस घालून येणे न जमणारे काम हे माझा नेहमीचा अनुभव आहे. संमेलनाचे सर्व गेस्ट हे मुंबईचे त्यामुळे नांदेडला येण्यासाठी देवगिरी आणि नंदीग्राम या दोन गाडी शिवाय आजिबात पर्याय नाही त्यातल्या त्यात नंदीग्रामसाठी निघायचे तर दुपारीच तयारी करावी लागते.संमेलन तर दिवसभर चालणारे मग देवगिरी हाच एक पर्याय शिल्लक होता.मुंबईच्या येणाऱ्या सर्व गेस्टनी या संमेलनाला दोन दिवस मोडतील म्हणून येण्यास नकार दिला. दरम्यान त्याच काळात नांदेडला विमान सुरु झाल्याची बातमी आली सर्व गेस्ट यांना परत संपर्क करून येण्यासाठी विनंती केली.त्यांनी होकार ही दिला. केतकर सर,आवटे सर,प्रज्ञा म्याम,ही मान्यवर त्यात होती.नांदेडला जाणारे विमान उडालेच नाही शेवटी ही सर्व मंडळी देवगीरीनेच नांदेडला आली. 

लोगो बनवण्यापासून ते पत्रिका काढण्यापर्यंत सर्व जय्यत तयारी नांदेडमध्ये सुरु होती. सर्वजण अगदी झपाटून कामाला लागले. पाहता पाहता संमेलनाचा दिवस उजाडला.आम्ही सारे मुंबईकर ठरलेल्या वेळेत पोहचलो. नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभाग्रहात ले सकाळी १० वाजताचे वातावरण मला आजही आठवते.संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होते पण १० वाजता पूर्ण सभाग्रह शिगोशिग भरले होते. सकाळी १० पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे वातावरण कायम होते. काय संमेलन झाले विचारू नका.सहा ते आठ मान्यवरची जी भाषणे झाली तशी भाषणे पुन्हा होणे नाही.असे वाटत होते दुपारनंतर संमेलनात असणारी पूर्ण गर्दी ओसरून जाईल,पण तसे झाले नाही.गर्दी कायम होती.सारे प्रेषक जणू बाबासाहेबांना आपल्यामध्ये समरस करून घेण्यासाठी आले होते.शांतपणे ऐकणे,जलोषपूर्ण टाळ्यांनी प्रतिसाद देणे या पलीकडे या संमेलनात बरेच काही घडत होते.कुणी नावासाठी पुढे पुढे करत नव्हते, कुणी मी संयोजक आहे म्हणून पुढेपुढे करत नव्हते,प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती.हे संमेलन चांगले झाले पाहिजे,संमेलनातून आपेक्षित आहे तो निरोप गेला पाहिजे. बस्स एवढेच..नाही तर बाकीचे संमेलने आपण पाहतोच ती कशासाठी होतात,आणि त्यातून काय साध्यही होते. अलीकडे काही साहित्य संमेलनांनी “संमेलने’ या नावाला किळस येईल असे वातावरण निर्माण केले आहे. संमेलने सतत का भरतात याचे महत्व मला ते संमेलन संपन्न होतांना पहावयास मिळाले. एखांदा विचार जर समाजमनावर बिंबवायचा असेल तर अशी वैचारिक संमेलने खूप महत्वाची असतात. 

गावाकडे वाढणारा प्रत्येकजण तिथल्या संस्कारामध्ये वाढतो जातीयता,उच्चनीचता मोठा छोटा हे सारे संस्कार इथेच होतात.एकीकडे बोध्दवाडा दुसरीकडे मातंगवाडा अशा जातीय हिन दर्जा देवून त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांना हीनवले जाते.त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही हा इतिहास वर्षानुवर्षापासून कायम आहे. माझ्या लहानपणी माझ्या गावात बोध्दवाड्यात होणारी छोटीशी भीमजयंती हा एकच कार्यक्रम.आणि इकडे मातंगवाड्यात साधेपणाने साजरी होणारी आणाभाऊ साठे यांची जयंती.दोन्ही ठिकाणी सारे दबक्या आवाजात. आणि इकडे उच्चवर्णीयांच्या गल्लीत मात्र होणारा प्रत्येक उत्सव कमालीचा असतो. अत्यंत उत्सात असतो.तिन्ही वस्तीतील मुले एकमेकांच्या समारंभात सहभागी होत नाहीत. कारण त्याच्या मनावर जोरकसपणे बिंबवले असते बोध्दवाड्याचे बाबासाहेब मातंगवाड्याचे अण्णाभाऊ साठे,आणि उच्चभू वस्तीचे सारे मग शिवाजी महाराजापासून ते खंडोबा,मसोबा,मराई,३३ कोटी सर्व नावे यात येतील. हीच शिकवण पुढे सतत डेव्हलप होताना दिसते. अलीकडे शिकलेल्याना अधिक ‘बाट’ होतांना दिसतोय.विद्यापीठ पातळीवर तर किवा खूप मोठ्या ठिकाणी हे प्रमाण अधिक पहावयास मिळते.बरे इकडे गावाकडच्या सारखी एकच स्थिती नाही येथे मागासवर्गीय आणि उच्चवर्गीय हे एकमेकांना कमी लेखताना अधिकपणे बघायला मिळते.एखांदा ब्राह्मण असला तर इतर सारे मागासवर्गीय या ना त्या कारणास्तव त्याचे लक्तरे तोडण्याची संधी कधी सोडत नाही.कुठे एखांदा दलितही ब्राह्मणांच्या कचाट्यात सापडतो.एकीकडे अगोदर शिक्षण नाही म्हणून त्या काळी वाईट स्थिती होती असे म्हंटले जाते आणि आता उच्चशिकलेले सवरलेले कसे वागतात? शहरात गळ्यात गळे घालून फिरणारे एका गावातले मित्र इतर गावात गेले की मात्र तू तुझ्या गलीत मी माझ्या गल्लीत असे फिरत असतात.त्यांना गावात एकमेकांशी बोलायला लाज वाटते . मला वाटते अशा अनेक वेगवेगळ्या मानसिकता दूर करण्यासाठी अशा संमेलनाची आवश्यकता असते. आपण किती ही शिकलो तरी गावतली मानसिकता आपण बदलू शकलो का?गावतल्या उच्चवर्णीय गल्लीत भीमजयंती कधी साजरी होणार?आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समतेची वागणूक मिळणार का ? हा खरा प्रश्न आहे.शहरात सारे काही ठीक आहे हो पण ज्या गावातून संस्क्रतीक शिकवणीची साखर पेरणी होते,तिथे काय करणार?अशी संमेलने तिथे औषधासारखी उपयोगाला येतील. पाटनुरमाझे गाव गावातल्या शाळेत मी पाचवीत असेल सकाळी प्रार्थना झाली आणि सर्व मुले वर्गात जावून बसली धुतराज नावाचे अत्यंत हुशार शिक्षक शिकवायला वर्गावर आले.शिकवणी सुरु होण्याच्या पूर्वी संदेश बिऱ्हाडे नावाचा एक विद्यार्थी आपल्या जागेवरून उठला आणि त्यांनी गुरुजीला प्रश्न विचारला प्रश्न ऐकून गुरुजी एकदम कोमात गेले.त्यांना काहीही उत्तर देता आले नाही.संदेश यांनी विचारलेला प्रश्न होता. “रोज सकाळी आम्ही तीन प्रार्थना गीत म्हणतो.खरातो एकची धर्म जगाला प्रेम आर्पावे,भारत माझा देश आहे,आणि सबके लिय खुला हे मंदिर ये हमारा. या तिन्ही गाण्यामध्ये असणारे विचार आमच्या जीवनातमात्र अजिबात नाहीत.मला गावातल्या मंदिरात जावू दिले जात नाही.गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमात मला सहभागी होवू दिले जात नाही.सार्वजनिक विहरीवर मला पाणी भरू दिले जात नाही.कुणाच्या लग्नात मी जेवायला गेलो तर मला माझी पत्रावळ स्वताला उचलावी लागते. कुणाच्या घरी गेलो तर माझ्यासाठी चहा घेण्यासाठी कोपर्यामध्ये ठेवलेला कप दिला जातो”..असे किती तरी प्रश्न संदेशचे होते. या सर्व प्रश्नातून आमच्या परिपक्व नसलेल्या लोकशाहीचे पाउलो पावली दर्शन होते. धुतराज गुरुजी काय?कोणतेही गुरुजी या प्रश्नाचे काय उत्तर देणार सामाजिक मानसिकतेपुढे शिक्षित शहाणपण फिके पडते हे धुतराज गुरुजीच्च्या चेहऱ्यावरून दिसत होते. 

फिक्या पडणाऱ्या चेहऱ्याला वैचारिक प्रारब्ध्ता मिळावी यासाठी अशी संमेलने आवश्क आहेत.संदेशला पुन्हा अशी प्रश्न पडू नये म्हणून अशी संमेलने आवश्क आहेत.या संमेलनातून डोस देणारा प्रत्येकजण आपल्या अनुभवाची शिदोरी समोर ठेवत असतो. त्याच्या प्रत्येक शब्दाला घटनेची आणि विचाराची झालर लागलेली आसते. 

या संमेलनात झालेल्या भाषणाचा थोडा थोडा अंश येथे घेण्याचा मोह मला अवरत नाही. 

कुमार केतकर :आता आपण ज्या वेळेला इथं जमलेलो आहोत, त्याच वेळेला वॉशिंग्टनला नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होती. आता नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणं हे सध्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय सयुक्तिक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे, की निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतरही काही प्रमाणात, की जो बराक ओबामाच्या निमित्ताने एक प्रकारे ‘शाप’ हा शब्द त्यांचा नाही, एक प्रकारे शाप अमेरिकन प्रशासनाला, अमेरिकन समाजाला, अमेरिकन इतिहासाला लागलेला होता, तो दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि त्याची प्रतीकरूप दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे ‘ओबामा केअर’ नावाने ओळखले जाणारे आरोग्य धोरण होतं. ओबामांनी आणलेलं ते मुळातच कुरकुडून काढायचं नुसतं तेवढंच झालंय. 
 

संजय आवटे :एवढी सगळी माध्यमे आहेत, पण तरी सुद्धा तुमचा विचार का आक्रसतोय? म्हणजे माध्यमं वाढत असताना माध्यमं विस्तारत असताना दाभोलकरांचा खून होतो, माध्यमं असतांना पानसरेंचापण खून होतो. माध्यमं विस्तारत असताना कलबुर्गेंचापण खून होतो. एकीकडे माध्यमे वाढताहेत, विस्तारताहेत आणि त्याच वेळी हे घडत आहेत, त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? एकीकडे शिक्षण जे आहे ते वस्तुनिष्ठ होत चाललेलं आहे. सिनेमा जो आहे अधिक वस्तुनिष्ठ, वास्तवदर्शी सिनेमा होत चालले आहे, याच्या उलट पत्रकारिता जी आहे, ती मात्र अधिक प्रौढवातावरणातील अधिक खोटी, अधिक कल्पक अशा प्रकारची होत चाललेली आहे.

उत्तम कांबळे :जगातलं कोणतंही पितृत्व हे गृहीत असतं; काल्पनिक असतं अन् मातृत्व ही वस्तुस्थिती असते. जे काल्पनिक असतं त्याचा आग्रह धरायचा नाही, ते शोधायचं नाही, कारण माझा बाप कोण आहे? हे फक्त जगात एकाच व्यक्तीला माहिती असतं, अन् ती म्हणजे आपली आई असते, आपण आईला कधीच चॅलेंज नाही करत, हाच का माझा बाप? जर पोराने चॅलेंज करायचं ठरवलं ना, तर रोज घरात खून, मारामाऱया, मुडदे पडतील. मुद्दा काय आहे की, सोशल जस्टीसचा अभाव आपल्या शिक्षणात कसा आहे. काय झाल्यानंतर सामाजिक न्याय ही लांब प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, शाहू महाराजांनी केली. ज्यांनी राखीव जागा सुरू केल्या, ज्यांनी शूद्रांसाठी शाळा चालू केल्या, महिलांसाठी शाळा चालू केल्या. त्यांनी सामाजिक न्याय किती सुंदर असतो 

भालचंद्र कांगो :“आज जेव्हा आपण बदलल्या परिस्थितीचा विचार करतो आणि सामाजिक न्याय या संकल्पनेवर विचार करण्याची पुन्हा वेळ आली का याचा विचार करतोय आणि अनेक धोक्याची घंटा वाजवल्या जातायत तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की, हा सामाजिक न्यायाचा आणि लोकांची चळवळ मजबूत करण्याचा प्रमुख खांब होता. श्रमिकांची चळवळ ही हादरलेली आहे. ती एका डिफेन्सीव्ह मूडमध्ये गेलेली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, जे मिळविलं ते टिकवायचं नवीन मिळविण्याची संकल्पना जी होती, ती 50 वर्षापूर्वी 1960- 62 साली जेव्हा आम्ही तरुण होतो, चेग वैराग सेड्युल्ड कॅस्ट्रो यांच्यासारख्या क्रांतिकारी मुलांची हॉस्टेलमध्ये चित्र लावणे आणि क्रांतीची स्वप्ने बघणं याच्यामध्ये आम्ही रममाण झालो होतो, ते दिवस आता गेलेले आहेत, आता क्रांतीची स्वप्नं लोक बघत नाहीत आणि म्हणून कामगार चळवळदेखील आपण जे मिळविलं ते टिकवा, बोनस टिकवा, ओव्हरटाईम टिकवा, आठ तासांचा दिवस टिकवा, महागाई भत्ता टिकवा, सामूहिक करार करण्याचे कायदे टिकवा, कामगार कायद्यात बदल करू नका, अशा प्रकारच्या डिफेन्सीव्ह, लढतात.. 

 बाबासाहेबांचे विचार प्रत्येक्षात आणायचे असल्यास समतेची आणि जागराची सांगड घालणे खूप आवश्यक आहे.अलीकडे आम्ही सगळीकडे कमी पडतोय. 

निमित एक संमेलन आहे मात्र लोकजागृती ही प्रक्रिया चिरंतर चालणारी आहे.या चिरंतर प्रक्रियेला चालवणारे जर चारच असतील तरी त्यांना आपले विचारचक्र सतत सुरु ठेवावे लागेल.नांदेडच्या संमेलनाला विरोध करणाऱ्यांची आणि टिंगलटवाळी करणाऱ्यांची कमी नव्हती पण जे ठरवले ते करून दाखवले.ज्यांनी हे करून दाखवले ते बाबासाहेबांचे बंदे होते,ते बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे होते.त्यांना या चराचरात बाबासाहेब निर्माण करायचे होते.म्हणून हे संमेलन सर्वांर्थाने यशस्वी झाले.
    
 


संबंधित बातम्या

Saam TV Live