मुंबईतील आक्‍सा बीचवर 'ब्लू बटण जेलीफिश'चं आगमन; या माशांना अजिबात हात लाऊ नका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

मुंबईतील मालाड येथील आक्‍सा बीचवर ब्लू बटण या जेलीफिशच्या वर्गातील सागरी जिवांचा प्रवेश झाला आहे. आक्‍सा बीचवर फेरफटका मारणाऱ्या आणि तिथे फिरण्यासाठी परायाताकाना मोठ्या संख्येने किना-यावर ब्लू बटण आढळून आलेत .

निळ्या रंगाच्या पारदर्शक पिशवीसारखे दिसणारे ब्लू बटण हातात सहज सामावतात. मात्र त्याच्या शेपटीला स्पर्श होताच दंश होऊन अंगावर लालसर चट्टे येतात. त्यामुळे ब्लू बटण या सागरी जिवांचा वावर असलेल्या आक्‍साबीचवर भेट देताना सावधानता बाळगा असं आवाहन मरीन लाइफ ऑफ मुंबई या संस्थेने केले आहे.
 
दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी ब्लू बटण मुंबई किना-याच्या दिशेने आलेले पाहायला मिळतात. हे सागरी जीव दंशकारी असल्याने गेल्या वर्षी आक्‍सा आणि गिरगाव चौपाटीमध्ये समुद्रात डुंबायला गेलेल्या अनेकांना ब्लू बटणने चावा घेतला आहे.

यंदाही सावधानता बाळगत ब्लू बटणचे आगमन लक्षात घेत किना-याला भेट देताना सावधानता बाळगा, आणि यांना हातात घेऊन फिरण्याचा विचार अजिबात करू नका. 

संबंधित बातम्या

Saam TV Live