अखाद्य बर्फाला देण्यात येणार निळा रंग 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे. अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांकडे असलेल्या थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनान कडक पावलं उचलली होती.

दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे. अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांकडे असलेल्या थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनान कडक पावलं उचलली होती. रस्त्यावरील बर्फाचे 74 टक्के नमुने दूषित असल्याचं उघड झाल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनाने अशा बर्फाला प्रतिबंध म्हणून त्याचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला.


संबंधित बातम्या

Saam TV Live