अवैध पार्किंग करणाऱ्यांना बसू शकतो 10 हजारांचा दंड

अवैध पार्किंग करणाऱ्यांना बसू शकतो 10 हजारांचा दंड

कधी भररस्त्यात, कधी रस्त्यालगत पार्क केलेल्या गाड्या... हे चित्र मुंबईकरांसाठी नवीन नाही. अनेकदा यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पार्किंग शुल्क वाचवण्यासाठी वाहनचालक रस्त्यावर मिळेल तिथे गाडी पार्क करतात. पण, आता तसं करता येणार नाहीए. कारण अशी बेशिस्त दाखवल्यास तब्बल 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

काय आहे हा नवा नियम?

  • मुंबईत मनपाची १४६ ठिकाणी पे अँड पार्क वाहनतळं आहेत
  • वाहनतळांपासून 1 किमी परिसरात पार्किंग करता येणार नाही
  • नियमबाह्य पार्किंग आढळल्यास दंड आकारला जाणार
  • वाहनचालकांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल 
  • दंड न भरल्यास वाहन 'टोइंग मशीन'द्वारे उचलून नेलं जाईल 
  • 7 जुलैपासून नियमाची अंमलबजावणी होणार आहे


मुंबई महापालिकेने बेशिस्त पार्किंगविरोधात बडगा उगारलाय. तर अपेक्षेप्रमाणे मुंबईकरांनी संताप व्यक्त केलाय. पालिकेने आकारलेला दंड जरा जास्तच आहे. त्यामुळे मुंबईकरांचा संताप होणं स्वाभाविक आहे. पण या कठोर पावलानंतर तरी मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल अशी अपेक्षा करु.

WebTitle : marathi news BMC to charge ten thousand rs for illegal parking 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com