मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज सादर झाला. यामध्ये महापालिका शाळांचे खासगीकरण करण्यावर जोर देण्यात आलाय. महापालिका शाळांमधली पटसंख्या कमी होऊ लागल्याने  या वर्षी खासगी-लोकसहभागातून ३५ शाळा सुरू करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे महापालिकेने शाळांचे खासगीकरण सुरू केल्याचे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे पालिकेने येत्या काही वर्षात ६४९ द्विभाषिक शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. एकूण २ हजार ५६९ कोटी रूपयांचा तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ५० कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज सादर झाला. यामध्ये महापालिका शाळांचे खासगीकरण करण्यावर जोर देण्यात आलाय. महापालिका शाळांमधली पटसंख्या कमी होऊ लागल्याने  या वर्षी खासगी-लोकसहभागातून ३५ शाळा सुरू करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे महापालिकेने शाळांचे खासगीकरण सुरू केल्याचे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे पालिकेने येत्या काही वर्षात ६४९ द्विभाषिक शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. एकूण २ हजार ५६९ कोटी रूपयांचा तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ५० कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बंद पडलेल्या ३५ शाळांच्या इमारतींमध्ये खासगी सहभागातून शाळा सुरू करण्यात येणारय.गेल्या वर्षीच्या २ हजार ३११ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यात यंदा २५८ कोटींची वाढ करण्यात आलीय. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live