BMC कडून रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 जून 2018

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये शनिवारपासून संबंधीत महापालिकेडून ही कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती बसल्याचे चित्र आहे.

त्याचबरोबर, कुठल्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली असून आता या बंदीविरोधात सूर उमटताना दिसत आहेत. दरम्यान आजपासून धडक कारवाई, छापेसत्र सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live