बॉडी बिल्डिंगसाठी धक्कादायक शॉटकट; तरूणाने घोड्याचं इंजेक्शन घेतलं अन् मानसिक संतूलन बिघडलं

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पिळदार शरिरयष्टीचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो. प्रत्येकाला सिक्स पॅक बिल्ट हवी असते. या सिक्स पॅक बिल्टसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण काहींना यातही शॉटकट हवा असतो. दिल्लीतल्या एका तरूणाला या शॉटकटची मोठी किंमत मोजावी लागलीय.

दिल्लीतल्या एका तरूणानं झटपट पिळदार स्नायू कमावण्यासाठी चक्क घोड्याला देतात ते AMP5 कंपाऊंड नावाचं इंजेक्शन घ्यायला सुरूवात केली. घोड्याला देण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचे सुरूवातीला फायदे दिसले पण नंतर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. तरूणाच्या थेट डोक्यावर परिणाम झाला.

बॉडी बिल्डर बनण्यासाठी मेहनत करा पण शॉटकट निवडू नका असा सल्ला मिस्टर ऑलिम्पिया सुहास खामकरनं दिलाय.

शरीर कमावण्याचे हे शॉटकट जिवघेणे ठरू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळं सिक्स ऍप बॉडिच्या नादात स्वताःच्या जिवाशी खेळू नका.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live