बॉलिवूडमध्ये उडता पंजाब? ड्रग्जप्रकरणी जाळ्यात सापडलेले ते 25 सेलिब्रिटीज कोण?

साम टीव्ही
शनिवार, 12 सप्टेंबर 2020
  • बॉलिवूड NCB च्या जाळ्यात
  • 'ते' 25 कलाकार कोण?
  • बॉलिवूडमध्ये उडता पंजाब?

बॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील कलाकरांची नावं समोर आलीयत. तब्बल 25 नावं समोर आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडालीय. कोण आहे ते बॉलिवूडचे 25 कलाकार पाहुयात? 

बॉलिवूड...ड्रग्ज...आणि नशा...सध्या बॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होतायत. आता रियाच्या चौकशीनंतर बॉलिवूडमधील 25 कलाकारांची नावं समोर आलीयत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील तीन बड्या कलाकारांची नावं रियाने सांगितल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडालीय. बॉलिवूडमधील नावं कळताच एनसीबीनं त्यांच्या विरोधात पुरावे जमा करायला सुरूवात केलीय. पण, NCB च्या रडारवर कोण आहे पाहुयात .

  • सारा अली खान, अभिनेत्री 
  • रकुलप्रीत सिंह, अभिनेत्री 
  • सिमोन खंबाटा, डिझायनर 

सध्या यांची नावं समोर आलीयत. यांच्यासोबत 25 जणांची नावं समोर आलीयत. आता एनसीबी यांच्या विरोधात पुरावे जमा करून त्यांना समन पाठवणार आहे.

ही नावं समोर आल्यानं आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या तपासाला आता आणखी वेग आलाय. याप्रकरणी रिया चक्रवर्तीसह 6 जणांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने ड्रग्स माफियांविरोधात कारवाई सुरू केलीय. एनसीबीने मुंबई आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

  • एनसीबीच्या चौकशीत रियाने अनेक मोठ्या नावांचा उल्लेख केलाय
  • NCB च्या पथकाने मुंबई, गोव्यात ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापे टाकले
  • अनुज केशवानीच्या चौकशीदरम्यान ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांची बरीच माहिती समोर आलीय
  • आता त्यांच्याविरोधात एनसीबी लवकरच कारवाई करू शकते. यामुळे बॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. पण, ते 25 बॉलिवूड कलाकार कोण? हे लवकरच समोर येईल.

संबंधित बातम्या

Saam TV Live