गर्भातच लिंगबदल करुन जादूटोण्यानं 10 हजार मुलं झाल्याचा दावा करणाऱ्या नगरच्या मेजरबाबाच्या भोंदूगिरीचा भांडाफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जग सूर्यावर स्वारी करायला निघालं असताना पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय. नगर जिल्ह्यातल्या कान्हूरपठार गावात बबन ठुबे उर्फ मेजरबाबानं अंधश्रद्धेचं दुकान थाटलंय. हा बाबा तंत्रमंत्राच्या सहाय्यानं अपत्यप्राप्ती करून देण्याचा दावा करतो. कळस म्हणजे गर्भातच मुलीचा मुलगाही केल्याचा दावा करतो. 

मेजरबाबा त्याच्याकडं गेलेल्या लोकांकडं एखाद्या डॉक्टरसारखी विचारपूस करतो.
या मेजरबाबाचं पितळ उघडं पाडण्यासाठी नगरमधील अश्विन भागवत यानं बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला.

पोलिसांनीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. पुरेसे पुरावे गोळा होताच या मेजरबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

लष्करात नोकरीला होतो असं सांगणाऱ्या या ठुबेला लोकं मेजरबाबा म्हणून हाक मारू लागले. या मेजरबाबाचा बाजार आता उठला असून तो आता कोठडीचे गज मोजू लागलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live