बोनी कपूर यांनी शेअर केला श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडीओ...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

मुंबई - हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर अकाउंट वरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. निमित्त होते बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या लग्नाचा 22 व्या वाढदिवसाचे. लग्नानंतर ही पहिलीच वेळ आहे की बोनी यांच्यासोबत श्रीदेवी नाही. हा व्हिडीओ मोहित मारवाह यांच्या लग्नातील आहे. यात श्रीदेवी सगळ्यांशी भेटताना, सर्वांसोबत डान्स करताना, हसताना दिसत आहे. 

बोनी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे, 'आज आमच्या लग्नाचा 22 वा वाढदिवस असता. जान... माझी पत्नी, माझी सोलमेट, प्रेमाचे प्रतिक, तुझे हास्य, माझ्यामध्ये नेहमीसाठी आहे...' 22 फेब्रुवारीला दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live