खामखेडमध्ये स्वाईन फ्लूचा बळी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

खामखेडा (नाशिक) : खामखेडा (ता. देवळा) येथील प्रशांत साहेबराव बोरसे (वय 26) या तरुणाचे नाशिक येथे उपचारादरम्यान स्वाईन फ्लूने निधन झाले.

प्रशांत खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले .सकाळी खामखेडा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापाठी मागे आई, वडील, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तीन दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने सटाणा येथील खाजगी रुग्णालयात यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Web Title: a boy dies due to swine flue

संबंधित बातम्या

Saam TV Live