VIDEO | उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसला मुलगा ?

VIDEO | उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसला मुलगा ?

उकळत्या पाण्यानं अंघोळ करणंही अनेकांना जमत नाही. पण, उकळत्या पाण्यात एक मुलगा बसून ध्यान करतो. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही,मात्र, याचा एक व्हिडीओ बनवण्यात आलाय...पण, हे कसं काय शक्य आहे? याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग जे सत्य समोर आलं ते ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

पेटत्या चुलीवर कढई, कढईत उकळतं पाणी आणि उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेला हा मुलगा. हे पाहून तुम्हालाही चमत्कार असल्यासारखंच वाटेल. पण, उकळत्या पाण्यात हा मुलगा ध्यानस्थ बसलाच कसा असाही प्रश्न पडेल. पाहणाऱ्यांना हाच प्रश्न पडलाय. उकळत्या पाण्यात बसलेला मुलगा पाहून हा चमत्कारच आहे असं म्हणत लोकांनी गर्दी केलीय. पण, खरंच हा मुलगा उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.

अशा प्रकारचे प्रयोग अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पाणीच नव्हे तर उकळत्या तेलातही हात बुडवल्याचे अनेक प्रयोग पाहिले असतील. पण, हे खरं असतं का? असे प्रयोग करून खूप पैसे घेतले जातात. मात्र, विज्ञानाच्या युगात हे कसं काय शक्य आहे. त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या तज्ज्ञांशी आमचे प्रतिनिधी भेटले. मग त्यांनी याबाबत कशा प्रकारे हातचलाखी केली जाते याबद्दल सांगितलं.

मुलगा बसलेली कढई आणि धग असलेली कढई यांच्यात थोडा गॅप असतो. त्यामुळं त्याला चटके लागत नाही. पण, ही हातचलाखी करून कशी फसवणूक केली जाते त्याबद्दलही अधिक माहिती जाणून घेतली.

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

  • कढई एक नसून दोन आहेत, एका कढईवर दुसरी कढई ठेवलीय
  • दोन कढईमध्ये किमान दीड ते दोन इंचाचं अंतर असतं
  • तापमान खालच्या कढईला लागतं
  • 200 डिग्री तापमान झाल्यानंरार वरच्या कढईपर्यंत तापमान वाढवू शकत नाही
  • कढईमध्ये पाण्यात नळी सोडल्याने हवेच्या बुडबुड्यांमुळे पाणी उकळतंय असं वाटतं
     

हे सगळं दिसून नये म्हणून पाण्यात फुलं टाकली जातात. तसं असलं तरी पाणी उकळत नाही आणि आपल्याला असं वाटतं चमत्कार करतोय. पण, कुणालाही पाण्यात हात टाकायला दिलं जात नाही. प्रयत्न केलात तर देवाचा कोप होईल किंवा काहीतरी अनर्थ घडेल म्हणून सांगितलं जातं. त्यामुळं कुणीही धाडस करत नाही. पण, आमच्या पडताळणीत उकळत्या पाण्यात मुलगा ध्यानस्थ बसल्याचा दावा असत्य ठरला. असा प्रयोग दाखवून कुणी पैसे मागत असेल तर तुम्ही बळी पडू नका. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com