तिने लग्नास नकार दिल्याने ‘गोल्डमॅन’चे गर्वहरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे - गडगंज संपत्तीचा वापर करून तिचे प्रदर्शन करण्याची अनेकांची वृत्ती आहे. संपत्तीमुळे आपण हवे ते विकत घेऊ शकतो, हा अनेकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, या संपत्तीला नाकारून हा समज बाळगणाऱ्या ‘गोल्डमॅन’चे गर्वहरण एकीने केले. तिने अशा प्रकारचे प्रदर्शन करणाऱ्या भावी वरास लग्नासाठी चक्क नकार देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली. सुरेश आणि सुनीता (नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित. सुनीता सर्वसामान्य कुटुंबातील असली तरी, एका राष्ट्रीयकृत बॅंकेत उच्च पदावर कार्यरत आहे. सुरेशच्या वडिलांकडे गडगंज संपत्ती असून, तो व्यवसाय करतो. घरच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले. परंतु, सुरेशला सोने अंगावर घालून ‘गोल्डमॅन’ म्हणून मिरविणे, किमती वाहने घेऊन फिरणे, याची त्याला मोठी हौस. 

मात्र, सुनीताला ते पटत नव्हते. त्या बाबत ती सुरेशला वारंवार समजावत होती. संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी एखाद्या सामाजिक कामाला वाहून घे. त्यामुळे समाजासाठी काही केल्याचे समाधान मिळेल, असा सल्ला ती त्याला देत होती. परंतु, सुरेश स्वभावात या गोष्टी बसत नव्हत्या. तो तिच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करत होता. मात्र, वारंवार समजावूनही सुरेश ऐकत नसल्याने सुनीताने सरळ लग्नालाच नकार  कळविला.

Web Title: Bride set a model before society by refusing to marry her future groom

संबंधित बातम्या

Saam TV Live