मुंबईत आणखी एक ब्रिज कोसळला, 5 मृत्युमुखी; मुंबईत माणसाच्या जिवाची किंमत शून्य?

मुंबईत आणखी एक ब्रिज कोसळला, 5 मृत्युमुखी; मुंबईत माणसाच्या जिवाची किंमत शून्य?

मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, इतर 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
दरम्यान, मुंबईत माणसाचा जीव किती स्वस्त असू शकतो आणि जगणं किती बेभरवशी असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळालंय. प्रशासनाच्या कृपेमुळे मुंबईतील कोट्यवधी जनता रोज मृत्युच्या सावटाखाली जगत असते आणि तरीही रोज पिचत-झगडत असते.

संध्याकाळची वेळ.. ऑफिसचं काम उरकून घरी धाव घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.. आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सायंकाळी रोजच्यासारखीच प्रचंड गर्दी होती.. ७.३० च्या सुमारास इथला पादचारी पूल कोसळला आणि त्यात दोन महिलांना जीव गमवावा लागला.. दोन कुटुंबं पूर्ण उध्वस्त झाली.. किमान ३४ जण जखमी झाले आहेत.. जे जखमी झाले, त्यांच्या जीवावर बेतलं नाही म्हणून नशीबवान म्हणायचे की ज्यांचा जीव गेला, ते अभागी म्हणायचे? 

इतर कुठेही मृत्युची टांगती तलवार घेऊन इतके नागरिक फिरत नसावेत.. कधी एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीमध्ये मुंबईकराचा जीव जातो.. तर कधी पावसाच्या पाण्यात बुडून हाच मुंबईकर मृत्युमुखी पडतो..

हातात लहान मूल घेऊन जाणारी एक महिला त्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकली.. तिचं काय झालं, हे अजून तरी समजलेलं नाही; पण झालेला प्रकार किती भीषण असू शकतो, याचा अंदाज तुम्ही-आम्ही बांधू शकतो.. झालेल्या घटनेनंतर हादरलेला एक टॅक्सीचालक वृत्त वाहिन्यांच्या कॅमेर्‍यासमोर सापडला.. त्याच्या सुदैवानं पूल कोसळला, त्या वेळी तो टॅक्सीमध्ये नव्हता आणि म्हणूनच बचावला.. काय प्रतिक्रिया द्यावी, हे त्याला सुचतही नव्हतं..

प्रशासनाच्या फायली जितक्या संथ गतीनं आणि मुर्दाडपणे हालतात, त्यापेक्षा जास्त गतीने काळ तुमच्या-आमच्यावर चाल करून येत असतो.. ही लढाई विषम आहे.. पूल पडत राहतील.. प्रशासन तसंच राहील आणि मुंबईकर पुन्हा त्याच्या 'स्पिरीट'ला जागून धावायला लागेल..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com