मेत्तुपलयम ते उधगमंडलम.. कोणी बुक केली आख्खी ट्रेन ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

कोयंबतूर : लग्नानंतर नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी विविध ठिकाणी जात असतात. तर काही विदेशात जाण्याचा पर्याय निवडतात. मात्र, एका ब्रिटिश नवविवाहित जोडप्याने आपल्या हनिमूनसाठी चक्क भारतीय रेल्वेच बुक केली. मेत्तुपलयम ते उधगमंडलम धावणारी ही रेल्वे त्यांनी बुक केली.  

30 वर्षीय ग्राहम विलियम्स लिन यांचा 27 वर्षीय सिल्विया प्लासिक यांच्याशी विवाह झाला. हनिमूनसाठी जायचे कोठे हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यानंतर त्यांनी निलगिरी पर्वताचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण रेल्वेतून प्रवास करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी चक्क दक्षिण रेल्वेची विशेष रेल्वेच बुक केली. या रेल्वेसाठी त्यांनी तीन लाखांचा खर्च केला. या नवविवाहित जोडप्याने 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन'च्या संकेतस्थळावरून पूर्ण रेल्वेच बुक केली. या जोडप्यांनी बुक केलेल्या रेल्वेत 120 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

दरम्यान, या ब्रिटिश जोडप्याने पहिल्यांदाच भारतीय रेल्वेतून प्रवास केला. या नवविवाहित जोडप्याचे मेत्तुपलयम आणि कून्नूरमधील रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. ही रेल्वे सकाळी 9.10 वाजता मेत्तुपलयमपासून सुटली आणि दुपारी 2.40 वाजता उटी येथे पोचली. 

WebTitle : marathi news british couple booked full train for honeymoon 

संबंधित बातम्या

Saam TV Live