VIDEO | देखण्या म्हशी आणि रेड्यांचा असा रँप वॉक कधी पाहिलाय का?

संभाजी थोरात
सोमवार, 16 डिसेंबर 2019

कोल्हापुरात काहीही होऊ शकतं. इथेच सौंदर्याला खरी जाण आहे. आणि बहुधा इथेच सौंदर्याची खाण आहे. म्हणूनच कोल्हापूरकर म्हैस आणि रेड्यांतही सौंदर्य शोधतायत. चला या अनोख्या स्पर्धेला हजेरी लावू. पाहुयात या रँप वॉकचं सविस्तर नाट्यमय विश्लेषण.

ह्यो फॅनचा जलवाय. लाडक्या म्हशीचा अन् रेड्याचा. औचित्य आहे ते देखणी म्हैस आणि श्री देखणा रेडा स्पर्धा 2019चं.बर ही सगळं घडतंय कुठं तर आपल्या कोलापुरात आहो कोलापूरच्या गडहिंग्लजमधी

ही काय साधा सुधा कार्यक्रम नाय. राज्यातनं ब्युटीफूल 80 म्हशी अन् 20 हॅडसम रेडं आल्यात. अन् उतरल्यात रॅम्प. अरर ररररा  खतरनाक अरं तुमच्या हिरो अन् हिरोनीला पाठवा कापूस येचायला तिकडं. या पठ्ठ्याकडं बघा . आहो हेअर स्टाईल इज स्टाईल बाबो अन् शिंग नादच खुळा

पण कोल्हापूरकरांनी यातही सौंदर्य शोधलंय... कारण रांगडेपणा अन् सौदर्य ही कोल्हापूरच्या मातीतच...

संबंधित बातम्या

Saam TV Live