मुंबईच्या डोंगरी भागात इमारत कोसळली; ढिगाऱ्यात 40 ते 50 जण अडकल्याची भीती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

मुंबईतील दुर्घटनांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईच्या डोंगरी भागात इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली तब्बल 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. डोंगरीतल्या तांडेल स्ट्रीटवर असलेल्या चार मजली इमारतीचा भाग कोसळला. 

केसरबाई असं याइमारतीचं नाव असल्याचं कळतंय. दरम्यान, अग्निशमन सोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे, ही इमारत ज्या ठिकाणी होती, त्याठिकाणी जायचा रस्ता अतिशय चिंचोळा आहे. त्यामुळे दुर्घटनास्थळी मदत पोहोचवण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळतेय. 

सध्या दुर्घटनास्थळी ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. अनेकजण या इमारतीखाली दबले गेलेत. त्यामुळे मोठी जीवितहानी या दुर्घटनेत होण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live