बुलढाणा जिल्ह्यातील पशु वैद्यकीय चिकित्सालय बनलं 'दारूचा गुत्था' ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पशु वैद्यकीय चिकित्सालयात सुट्टीच्या दिवशी ओली पार्टी होत असल्याचं समोर आलं. इमारतीच्या आवारातील संरक्षण भिंतीच्या दरवाज्याला बाहेरून भलं मोठे कुलूप दिसून आलं तर आतमध्ये ओली पार्टी सुरु असल्याचं आढळून आलं.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पशु वैद्यकीय चिकित्सालयाचा वापर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दारु पार्टीसाठी केल्याचा प्रताप उघडकीस आलाय. जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा विभाग आहे.

मात्र, याच ठिकाणी ही ओली पार्टी झाल्याचं समोर आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. संत नगरी शेगाव येथे पशु वैद्यकीय चिकित्सालयाची प्रशस्त अशी इमारत आहे. या चकित्सालयात शेगाव शहरासह तालुक्यातील जनावरांच्या विविध रोगांवर उपचार केले जातात, असं कागदावरील रेकॉर्ड सांगतात.

मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी काही वेगळेच प्रकार सुरू असल्याची कुणकुण अनेक दिवसांपासूनच परिसरात होत होती. विशेष करून सुट्टीच्या दिवशी इथं ओली पार्टी होत असल्याचं समोर आलंय. इमारतीच्या आवारातील संरक्षण भिंतीच्या दरवाज्याला बाहेरून भलं मोठे कुलूप दिसून आलं तर आतमध्ये ओली पार्टी सुरु असल्याचं आढळून आलं.

पत्रकार आले समजताच डॉक्टरांची घाबरगुंडी उडाली. दरम्यान पत्रकारांनीं भिंतीवरून उड्या मारून आवारात प्रवेश केला तर इमारतीच्या खाजगी चौकीदाराने पार्टीमधील दारुच्या बाटल्या आणि मटण इमारतीच्या मागच्या बाजूस आणून ठेवलं.

WebLink : marathi news buldana animal husbandry hospital liquor party   


संबंधित बातम्या

Saam TV Live