बुलडाणा, हिंगोलीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची परिथिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्य कर्मचारी संघटनेच्या 3 दिवसीय लाक्षणिक संपाला आजपासून सुरुवात झालीय. या संपात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 28 संघटना सहभागी झाल्यात. 13 हजार कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतलाय. तर अत्यावश्यक सेवा असलेले आरोग्य कर्मचारी काळ्या फिती लावून संपात सहभागी झालेत. 

दरम्यान, हिंगोलीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय. या संपाचे हिंगोलीमध्येही पडसाद पहायला मिळाले. सरकारने, या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर देखील कर्मचार्यांनी संप पुकारला आहे.

ससून रुग्णालयात संपाचा परिणाम नाही 

पुण्यातल्या ससून रुग्णालयात मात्र या संपाचा परिणाम झालेला दिसत नाहीय. रुग्णालयाचं कामकाज रोजच्या प्रमाणे सुरू आहे. संपात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला नाही कारण या आधीच्या संपात ससूनमधील कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यात आलाय. त्यामुळे या संपात हे कर्मचारी सहभागी नाहीत.

WebLink  : marathi news buldana hingoli and pune condition of state employee strike

संबंधित बातम्या

Saam TV Live